The bread of life Dr. Khankhoje

बालगंधर्व रंग मंदिर पुणे 

7नोव्हेंबर 2023

संकलित लेख 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत क्रांतिकारक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे स्मृती संस्था आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनाइसेशन, नागपूर प्रस्तुत,भारतीय क्रांतिकारक व कृषीशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्या जीवनावर आधारित हिंदी नाटक

ब्रेड ऑफ लाईफ

डॉ. खानखोजे ( अनसंग हिरो)

क्रांतिकारी गदर संस्थेचे संस्थापक व प्रतिभावंत कृषी शास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या जीवनावरील नाटक “द ब्रेड ऑफ लाइफ-डॉ.खानखोजे”(द अनसंग हिरो) या हिंदी नाटकाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आला. १३९ व्या जयंती निमित्त क्रांतिकारक पां.स.खानखोजे स्मृती संस्थेने याचे आयोजन केले होते.

डॉ. खानखोजे यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व कुटुंबीय ज्योती, राजश्री, प्राजक्ता, सरिता खानखोजे व ईतर खानखोजे कुटुंबीय उपस्थित होते.

दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या श्रीमती वीणा ताई गव्हाणकर तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील खानखोजे,पुण्यातील विश्वस्त श्री. दिलीप खानखोजे, श्री. प्रशांत खानखोजे, श्रीमती मीनाताई करदळे खानखोजे तसेच संस्थेचे सल्लागार डॉ. भाले आणि या नाटकाच्या दिग्दर्शिका श्रीमती मंगला सानप यांचे हस्ते संपन्न झाले. यानंतर संस्थेच्या अध्यक्षांनी प्रमुख पाहुणे श्रीमती वीणा ताई गव्हाणकर यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. श्रीमती राजश्री खानखोजे यांनी सुरेख आवाजात गणेश वंदना पूर्ण केली.

खरे सांगायचे झाले तर क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे स्मृती संस्था नव्याने स्थापन झालेली असून क्रांतिकारक डॉ. खानखोजे यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या महान कार्याविषयी लोकांना कळावे या उद्देशाने पुण्यात अगदी प्रथमच हा प्रयोग करण्याचे संस्थेने ठरविले.तत्क्षणी सर्वात महत्वाची मदत लागणार होती ती म्हणजे पैशांची आणि 20 दिवसात या सर्व गोष्टींची पूर्तता होणे ही तेवढेच आवश्यक होते,पण काय आश्चर्य ज्यांना ज्यांना आम्ही जाऊन भेटलो त्या सर्वानी आम्हाला सढळ हस्ताने मदत केली आहे. त्यात बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी ली,पॅनाटेक एशिया इंजिनीरिंग प्रा. ली,रीमि्लेक्स, विदर्भवासी पुणेनिवासी संस्था,श्रीटेक डेटा लिमिटेड.प्रत्येक प्रायोजक हा त्यांच्या क्षेत्रात हिरो आहे आणि तंत्रज्ञान उद्योगाला प्रगत करण्यात त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या उदार सहकार्यामुळेच आजचा कार्यक्रम घडून आला. आमच्या संस्थेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल या निमित्त्याने पुष्प गुच्छ आणि डॉ.खानखोजे यांचे स्मृती प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

आजच्या ब्रेड ऑफ लाईफ या नाटकाच्या लेखिका मंगला सानप यांचा श्रीमती ज्योती खानखोजे आणि श्रीमती प्राजक्ता खानखोजे यांनी शाल देऊन सत्कार केला.

क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे स्मृती संस्थेला अतिशय महान, विद्वान अशा लोकांचा पाठिंबा, मार्गदर्शन आणि लोभ लाभला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचेही स्मरण करण्यात आले.

श्री शरद बोबडे, माजी सर न्यायाधीश 

पदमविभूषण श्री माशेलकर सर, FRS वरिष्ठ शास्त्रद्न्य 

 सल्लागार मंडळ 

डॉ सावित्री सहानी, डॉ पांडुरंग खानखोजे यांच्या कन्या 

तसेच डॉ निंबाळकर पंजाबराव कृषी विद्यापाठाचे माजी वाईस चॅन्सलर

डॉ विलास भाले, माजी कुलगुरू, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला

यांच्या मार्गदर्शनाबद्दल यांचे आभार मानण्यात आलेत.

तसेच या अभिनव प्रयोगकारिता विशेष उपस्थितामध्ये श्री.समर नखाते फिल्म समीक्षक, पूर्व निर्देशक FTI,श्री.विशाल शिंदे आयोजक पुणे फिल्म फेस्टिवल,श्री.किरण यज्ञोपवीत फिल्म लेखक

यांचेही विशेष आभार मानण्यात आलेत.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पुणे आणि पनवेल एरिया यांचेही पाठबळ आजच्या कार्यक्रमाला लाभले.

कार्यक्रम सर्वसिद्ध होण्याचे कारण म्हणजे चकास्तु फिल्म्स चे आनंद पंडित आणि गायत्री फाटक यांचा सत्कार संस्थेच्या पुण्यतील विश्वस्त यांनी केला.डॉ. प्रशांत खानखोजे यांनी सर्वांच्या आभारप्रदर्शनाची जाबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

थोड्याच वेळात द ब्रेड ऑफ लाईफ या नाटकाच्या अभिनव प्रयोगला सुरुवात झाली. एक अंकी प्रयोग असल्यामुळे मध्यन्तर हा प्रकार नाही. डॉ. खानखोजे यांच्या जीवनातील एक एक प्रसंग इतके सुरेख उभे केलेत की प्रेक्षक प्रत्येक प्रसंगाशी समरस होऊन गेलेत. गोरगरिबांना भाकर मिळवून देणारा शास्त्रज्ञ , हरित क्रांतीचे जनक आणि गदर संस्थेचे संस्थापक  असं थोडक्यात वर्णन आपण डॉ. खानखोजे यांचे करू शकतो. डॉक्टर खानखोजे यांचा जन्म वर्धा येथील पालक वाडी या छोट्याश्या गावी ७ नोव्हेम्बर, १८८४ रोजी झाला आणि म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

डॉक्टरांचे सशस्त्र क्रांती तसेच हरित क्रांती अश्या दोन्ही गोष्टीचा समतोल शास्रोक्त पद्धतीने सांभाळण्यामधील कौशल्य प्रत्येक प्रसंगातून निदर्शनास येतं होते इतके सुरेख सादरीकरण होते.आवश्यकते नुसार लष्करी शिक्षण घेऊन ब्रिटिशांचे विरुद्ध उठाव करण्यासाठी स्वतःला सज्ज करुन त्याप्रमाणे बाहेर राहून सर्व प्रकारचे सहाय्य करण्यातील नियोजन बद्ध योजना.

सगळेच कसे प्रत्येक पाऊलावर आवाहनं स्वीकारत कुठल्याही प्रकारे पाठबळ नसताना तेही परकीय भूमिमध्ये म्हणजे खरोखरच आवाहानात्मक आयुष्य जगलेत कल्पना सुद्धा केली तर अंगावर काटा येतो.

हरित क्रांतीचे महत्व समजून त्या विषयाचे शास्रोक्त शिक्षणा साठी १९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले आणि ओरेगन कृषी महाविद्यालयात त्यांनी शेतीचे शिक्षण घेतले. इकडे शिक्षण सुरु असताना त्यांना त्यांची देशभक्ती स्वस्थ बसू देत नव्हती यासाठी लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारताबाहेरून क्रांतिकारी कार्य सुरु ठेवले. एक क्रांतिकारक म्हणून डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा प्रवास जाणून घेणं मोलाचं ठरेल, कारण भारताबाहेर राहून ते पूर्णतः स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. इंडिया इंडिपेडन्स लीग हि त्यांची संस्था जिचं नामकरण लाला हरदयाळ यांनी नंतर गदर असे केले, यांचा पहिल्या महायुद्धातही सहभाग होता.

क्रांतिकारी म्हणून काम करता करता ते मेक्सिको मध्ये गेले आणि देशसेवा हीच लोकसेवा या तत्वाला अनुसरून त्यांनी तिथे कृषी संशोधन आणि अध्यापनात स्वतःला झोकून दिले. त्याचेच फलित म्हणून मेक्सिको मध्ये मका आणि गहू यांच्या उत्पादनात हरितक्रांती झाली. १९४९ साली ते भारतात आले आणि त्यानंतर ते १९५५ मध्ये नागपूरला कायमचे स्थायिक झाले आणि भारतात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हावेत म्हणून ते सक्रिय राहिले. त्यांच्या या मानवतेच्या अजोड कामाची दखल घेत, मेक्सिकोच्या सरकारने त्यांचा पुतळा शापिंगो कृषी विद्यापीठात बसवला आहे.

आज त्यांचे कार्य विस्मरणात गेले असले तरी आपल्या थोर समाजसेवकांची आपण जाणीव ठेवणे अत्यावश्यक आहे आणि याच उद्देशाने नाटकाच्या अश्या अभिनव प्रयोगातून डॉक्टर खानखोजे यांचे महान कार्य तसेच संशोधनाची माहिती आजच्या पिढीला आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून आमचा एक छोटासा प्रयत्न आहे…..

अश्या या थोर क्रांतीकारक आणि कृषी शास्त्रज्ञ् यांना आमचा सलाम…

संकलन

दिलीप खानखोजे 

One thought on “The bread of life Dr. Khankhoje

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *